मोदींसारखे स्वार्थी होऊ नका : प्रकाश आंबेडकर

योगेश पायघन
सोमवार, 9 जुलै 2018

औरंगाबाद - अमेरिकेत कुटुंब वत्सल व नीतिमत्तेच्या संकल्पनेला पाहून लोक राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. आपल्याकडे हे पहिले जात नाही. प्रत्येक वंचित उपेक्षितांसाठी कुटुंब वत्सल म्हणून सत्तेत येणे गरजेचे आहे. आता कुणाला मागायचे नाही. स्वतःच सत्तेत उतरून वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निर्धार केल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तर सुरुवातीलाच सेल्फी म्हणजे सेल्फीश म्हणत मोदींसारखे स्वार्थी होऊ नका असे सेल्फी घेणाऱ्या तरुणांना उद्देशून बोलताना ते म्हणाले.

ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजाच्या राजकीय शैक्षणिक सामाजिक समस्यांसंदर्भात स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीची संवाद यात्रेत सोमवारी (ता 9) ते बोलत होते. मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, विजय मोरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

सरकारी कार्यालयात मनुवादी व ब्राह्मणवादी विचारसरणीचे कर्मचारी अधिकारी वंचित भटक्या विमुक्तांची अडवणूक केली जात आहे. कैकाडी, मुस्लिम, वडार, धनगर, नाथजोगी, आदिवासी कोळी, खाटीक संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांच्या व्यथा संवाद यात्रेत मांडल्या. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीला साथ देण्याचा निर्धार केला.

Web Title: Do not be selfish like Modi: Prakash Ambedkar