व्यवसायातील पैसे इतर क्षेत्रांत वळवू नका - अशोक पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

औरंगाबाद - कोणत्याही व्यवसायात मेहनत आणि पारदर्शकता असायला हवी. व्यवसायातील पैसे शेती, घर, गाडी, राजकारण अशा इतर क्षेत्रांत वळवू नका, असे आवाहन प्रसिद्ध सीए अशोक पाटील यांनी केले आहे. 

शहरात आयोजित व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात ‘आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटील बोलत होते. 

अशोक पाटील सोयगाव तालुक्‍यातील माळेगाव पिंप्री या तीनशे लोकवस्तीच्या खेड्यातील रहिवासी आहेत. एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.  गावाच्या पारावरील शाळेपासून शाळा बदलत ते पुण्याला पोचले आणि आज राज्यातील नामवंत चार्टर्ड अकाउंटंट आहेत. राम पवार यांनी प्रास्ताविक केले. संदीप खरात, नितीन भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. गणेश शिंदे आभार मानले. 

अशोक पाटील यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
 शेती हा व्यवसाय असल्याने शेतकऱ्याचे मूल जन्मतः व्यावसायिक आहे. 
 प्रवाहाविरोधात पोहणारे यशस्वी होतात. 
 पैसा आहे तेथे हिशेब असलाच पाहिजे. 
 वेळा पाळून सर्व गोष्टी नियोजनपूर्वक केल्यास यश हमखास 
 आवडीच्या क्षेत्रात काम करायला हवे. 
 व्यवसाय निवडल्यावर पूर्णतः झोकून देऊन कष्ट हवेत. 
 गरजेपेक्षा जास्त गुंतवणूक, कर्जही नको. 
 व्यवसायात तेजी-मंदी असल्याने भांडवल दुसऱ्या व्यवसायात गुंतवून जोडव्यवसाय करा.
 टॅक्‍स वेळेवर भरा, त्यामुळे देशाबरोबरच स्वतःची प्रगती होते. 

Web Title: Do not divert business money into other areas ashok field