स्वातंत्र्यविरांचे हौतात्म्य विसरता कामा नये : दीपक केसरकर

स्वातंत्र्यविरांचे हौतात्म्य विसरता कामा नये : दीपक केसरकर

नांदेड : निजामी राजवटीच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला. स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याची परंपरा मराठवाडा मुक्ती संग्रामातून मिळाली. स्वामी रामानंद तीर्थ, दीगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंह चौहाण, भाऊसाहेब वैशंपायन आदींच्या नेतृत्वाखाली अनेकांनी बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान, हौतात्म्य कदापीही विसरता कामा नये, असे मत गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक  केसरकर यांनी व्यक्त केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त ते सोमवारी  (ता.17) बोलत होते. माता गुजरीजी विसावा उद्यान येथील हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभाजवळ हा समारंभ झाला. केसरकर यांनी स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी नारायणराव भोगावकर, महापौर शीला भवरे, आमदार अमर राजूरकर, राम पाटील रातोळीकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, विभागीय पोलिस महासंचालक फत्तेसिंह पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, 
महापालिका आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
 अशोक काकडे, पोलिस अधिक्षक संजय जाधव, अप्पर पोलिस अधिक्षक (गृह) अक्षय
 शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह माजी सैनिक संघटनेतर्फे 
रामभाऊ फडके आदींनी अभिवादन केले. दरम्यान उपस्थित सर्व स्वातंत्र्यसैनिकांसोबत श्री. केसरकर यांनी संवाद साधला. त्यांना प्रशासनाच्या वतीने भेट दिली. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन करताना मराठवाडा मुक्ती संग्रामचा इतिहास उलगडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com