लातूर महापालिकेत फसव्या भाजपला निवडून देऊ नका - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

लातूर - सामान्य माणसांना अच्छे दिनचे स्वप्ने दाखवून देश व राज्यात जनतेला फसवून सत्तेत आलेल्या सरकारने भ्रमनिरास केला आहे. महापालिकेच्या निवडणुकीतही फसवी आश्‍वासने देऊन सत्तेत येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या फसव्या भाजपला महापालिकेत निवडून पश्‍चात्तापात पडू नका, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केले. पालिकेत 13 जागांवरील राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर सत्तेत येईल, असा दावाही त्यांनी केला. 

महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारासाठी सोमवारी (ता. 27) रात्री डॉ. आंबेडकर चौकातील सभेत ते बोलत होते. पक्षाचे निरीक्षक जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, अशोक गोविंदपूरकर, प्रदेश सरचिटणीस पप्पू कुलकर्णी, मुर्तुजा खान, संजय बनसोडे, नगरसेवक राजा मनियार, विनोद रणसुभे, नवनाथ आल्टे, राजेंद्र इंद्राळे, बबन भोसले, इब्राहीम सय्यद, रेहाना बासले, राहुल माकणीकर, इर्शाद तांबोळी, संजय शेटे, प्रशांत पाटील, शारदा बनसोडे, कौसरबी सय्यद, लाला सुरवसे, किरण बडे, संजय सोनकांबळे, अनिल गायकवाड, रेखा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. मुंडे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कार्य केले. पाणीटंचाईमुळे लातूर बदनाम होताना राष्ट्रवादीमुळेच सरकारला पाणीप्रश्‍नाची दखल घ्यावी लागली. टंचाईत आमच्या नगरसेवकांनी चांगले काम करून लोकांपर्यंत पाणी पोहोचविले. प्रत्येक कार्यकर्ता पाण्यासाठी झटला. आता राष्ट्रवादीच्या हाती सत्ता देऊन शहराचा विकास घडवून आणावा. येत्या काळात भाजपचे फसवे नेते येऊन भाषणे देतील. लातूरला दत्तक घेतल्याचे मुख्यमंत्री सांगतील. त्यांनी यापूर्वी दत्तक घेतलेल्या जिल्ह्यांचे काय झाले, ते विचारा. पालिकेत राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक आहेत. कॉंग्रेसने सन्मानपूर्वक प्रस्ताव दिल्यास आघाडीचा विचार होईल. अन्यथा 18 प्रभागांतील 70 जागांवर राष्ट्रवादी स्वबळावर लढेल तेव्हा ना हात ना कमळ फक्त घड्याळ निवडून येईल, असा विश्‍वास श्री. मुंडे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी राजकीय पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Do not Latur municipal corporation elected BJP