डॉक्‍टरची वीस लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

नांदेड - सातारा येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमडी मेडिसीन प्रवेशासाठी येथील एका डॉक्‍टरकडून वीस लाखांची रक्कम घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड - सातारा येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमडी मेडिसीन प्रवेशासाठी येथील एका डॉक्‍टरकडून वीस लाखांची रक्कम घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड येथील खमर हॉस्पिटलचे डॉ. जुनेद अहेमद महमद खुर्शिद यांना वैद्यकीय क्षेत्रात पुढील शिक्षण घ्यायचे होते. त्यांनी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे असलेल्या कृष्ण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मेडिकल कॉलेज येथे एमडी मेडिसीनच्या प्रवेशासाठी संपर्क साधला. या वेळी याच कॉलेजमधील काहीजण प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे आले. त्यांनी तुम्हाला एमडी मेडिसीनला प्रवेश देतो असे सांगत यासाठी वीस लाख रुपये उकळले होते.

Web Title: Doctor 20 lakh ruppes cheating crime