esakal | प्रेमीकेसह डॉक्टरला पत्नीनेच पकडले रंगेहात, येलदरीतील प्रकार 
sakal

बोलून बातमी शोधा

3love_20crime_0.jpg

रंगेल डॉक्टरसह त्याच्या प्रेमिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी (ता.एक) त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. 

प्रेमीकेसह डॉक्टरला पत्नीनेच पकडले रंगेहात, येलदरीतील प्रकार 

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर ः पत्नी घरात नसल्याची संधी साधून प्रेमिकेसोबत प्रेमाचे चाळे करणाऱ्या डॉक्टर पतीस पत्नीनेच रंगेहात पकडल्याची घटना येलदरी (ता.जिंतूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानात रविवारी (ता.३१) रात्री घडली. दरम्यान, रंगेल डॉक्टरसह त्याच्या प्रेमिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी (ता.एक) त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. 

प्रेमिकेस घेतले येलदरी येथील निवासस्थानी बोलावून
येलदरी (ता.जिंतूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास पवार असे या रंगेल डॉक्टर पतीचे नाव आहे. डॉ.पवार यांचे त्यांच्यासोबत कोल्हा (ता.मानवत) येथे कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या सहकारी परिचारिकेसोबत प्रेमसंबंध होते. परंतू, याची वाच्यता गावभर झाल्याने या दोघांनाही दुर करण्यात आले. परंतू, कालांतराने डॉ.कैलास पवार यांची येलदरी येथे बदली झाली. त्यानंतर ही डॉ.पवार यांच्या प्रेमाचे चाळे सुरु असल्याची माहिती त्यांच्या पत्नीला मिळाली होती. 
ता. २७ जानेवारी रोजी डॉ.पवार यांच्या पत्नीची प्रकृती बरोबर नसल्याने त्या औरंगाबाद येथे उपचारासाठी गेल्या होत्या. ही संधी साधत डॉ.कैलास पवार यांनी प्रेमिकेस येलदरी येथील निवासस्थानी बोलावून घेतल्याची माहिती डॉक्टरांच्या पत्नीला मिळाली होती. 

हेही वाचा - विद्यार्थ्यांनी पालकांशी व स्वत : शी प्रामाणिक राहण्याचा सल्ला- एस. एस. तोटेवाड

पोलिसांनी डॉ. पवार यांच्यासह प्रेमिकेस घेतले ताब्यात 
घटनेत रविवारी, ता.३१ जानेवारीला रात्री वडील व भावासोबत त्या येलदरी येथील घरी आल्या. तेव्हा घरात डॉ. कैलास पवार व त्यांची प्रियसी विचित्र अवस्थेत आढळून आले. पत्नीने तातडीने ही माहिती जिंतूर पोलिसांना दिली. पोलिसांनी रविवारी रात्रीच डॉ. पवार यांच्यासह त्यांच्या प्रेमिकेस ताब्यात घेतले. सोमवारी दुपारी डॉ. पवार यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली. 

हेही वाचा - हिंगोली : जिल्ह्यात २२१ अंगणवाड्या झाल्या बोलक्या, एक समान झाली रंगरंगोटी

डॉक्टरसह कुटूंबियावर गुन्ह्याची नोंद 
डॉ.कैलास पवार यांच्या पत्नीने पोलिसांकडे आपला सासरकडील मंडळीकडून छळ सुरु असल्याची तक्रारही दिली आहे. या तक्रारीवरून पती डॉ.कैलास पवार, सासरा काशिनाथ पवार, सासू गोदावरी पवार, दीर किशोर पवार, नणंद कविता पवार यांनी आपला शारिरीक व मानसीक छळ करून आपल्याकडे पैश्याची मागणी केल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर

loading image
go to top