दरोडेखोरांच्या हल्ल्यात डॉक्‍टर दांपत्य जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

शहरातील समर्थनगर भागात डॉ. सुरेश करंजकर यांच्या घरावर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकून साडेबावीस लाखांचा ऐवज लुटल्याच्या घटनेने खळबळ उडाली. दरोडेखोरांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात डॉक्‍टरांसह त्यांच्या पत्नी डॉ. शारदा जखमी झाल्या आहेत.

उस्मानाबाद - शहरातील समर्थनगर भागात डॉ. सुरेश करंजकर यांच्या घरावर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकून साडेबावीस लाखांचा ऐवज लुटल्याच्या घटनेने खळबळ उडाली. दरोडेखोरांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात डॉक्‍टरांसह त्यांच्या पत्नी डॉ. शारदा जखमी झाल्या आहेत.

वरुडा रोडवर डॉ. सुरेश करंजकर यांचे हॉस्पिटल, तर बाजूलाच घर आहे. पहाटे सव्वातीनच्या सुमारास तोंडाला मास्क, रुमाल बांधून दहा ते बारा जणांचे टोळके तेथे आले. त्यातील काहींनी गेटवर चढून घराच्या अंगणात प्रवेश केला.

दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. डॉ. सुरेश करंजकर, पत्नी शारदा करंजकर, जावई दीपक फाटक, मुलगी श्रुती यांना तलवार, गुप्ती, लोखंडी रॉड, कत्तीचा धाक दाखवीत मारहाण सुरू केली. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, कपाटातील २१ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, दोन मोबाईल, रोख ३० हजार, असा एकूण २२ लाख ५७ हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. मारहाणीत डॉक्‍टर दांपत्य जखमी झाले आहे. दहा ते १२ जणांविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Couple Injured in Robber Attack Crime