अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, डॉक्टरांच्या सर्तकतेमुळे घटना आली उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

लोहारा  तालुक्यातील सास्तूर येथे एका गावात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (ता. १९) डॉक्टरांच्या सर्तकतेने उघडकीस आली.

लोहारा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील सास्तूर येथे एका गावात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी (ता. १९) डॉक्टरांच्या सर्तकतेने उघडकीस आली. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून आरोपी पीडितेवर पाळत ठेवून होते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कोणी नसल्याच्या फायदा घेत त्यांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर साधला निशाना

यात पीडितेची प्रकृती खालावली. तिच्या पालकांनी तिला स्पर्श ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी उलट्या, जुलाब होत असल्याचे सांगितले. परंतु, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यात तिने चौघांनी अत्याचार केल्याचे सांगितले. याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर पीडितेला पुढील उपचार व तपासणीसाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यातील चारही आरोपी १६ ते १७ वयोगटातील असल्याचे सांगितले जात असून, यातील एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद झालेला नव्हता. या बाबत पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन म्हणाले, की एका संशयितास ताब्यात घेतले आहे. पीडितेच्या जबाबानंतरच काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत, अशी माहिती त्यांनी ‘सकाळ’ला दिली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Disclose Molestation Case In Lohara Block Osmanabad News