डॉक्‍टर-रुग्णाचे नाते पुन्हा दृढ व्हावे - डॉ. सुभाष दलाल

डॉ. सुभाष दलाल
डॉ. सुभाष दलाल

औरंगाबाद - काळानुरूप डॉक्‍टर आणि रुग्ण यांचे नाते दुरावत असून, एकेकाळी ‘देव’ मानल्या जाणाऱ्या डॉक्‍टरांना मारहाण किंवा न्यायालयातील दावे सहन करावे लागत आहे. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्‍टर दोहोंचेही नुकसान होत आहेत. दोघांमधील नाते पुन्हा दृढ व्हावे, अशी आशा ज्येष्ठ बालरोग शल्यचिकित्सक डॉ. सुभाष दलाल यांनी व्यक्त केली. तब्बल साठ वर्षांच्या रुग्णसेवेचा अनुभव असलेले डॉ. दलाल एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून त्यांचा प्रवास उलगडला.

त्यांनी १९५४ साली प्रॅक्‍टिस सुरू केली. देशविदेशातील बालकांच्या अतिजटिल शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा हातखंडा होता. एकाच परिवारातील चार पिढ्यांचे उपचार करण्याइतपत त्यांची कारकीर्द प्रदीर्घ राहिली, तर आजच्या सर्जन्ससाठी ते ‘आयकॉन’ आहेत. आतादेखील अनेक डॉक्‍टर्स सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. नव्या पिढीतील बालरोग शल्यचिकित्सक छोट्या शहरांकडे वळत आहेत. त्यांच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

डॉक्‍टरांच्या शुल्कावरच लक्ष का ?
वैद्यकीय सेवांचे दर अस्मानाला भिडले आहेत. यासाठी डॉक्‍टरांचे शुल्क नियंत्रित करायला हवे, असा विचार मांडला जातो. मात्र, वकिलांच्या काही मिनिटांच्या सल्ल्यासाठी लाखो रुपये मोजले जातात. गुणवत्तेच्या नावाखाली वस्तूंचे दरही हवे तेवढे आकारले जातात. मग, डॉक्‍टरांच्या सेवांचे शुल्क नियंत्रित करण्यावर सर्वांचे लक्ष का असते? असा सवालही त्यांनी केला. 

गुंतागुंतीची अतिजटिल शस्त्रक्रिया 
एका जन्मजात बालकाचे हृदय शरीराबाहेर होते. शस्त्रक्रिया करून ते शरीराच्या आत रोपित करण्याचे आव्हान यशस्वी पेलणे ही जीवनातील कायम आठवणीत राहणारी शस्त्रक्रिया होती. सहा महिन्यांच्या मुलीच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया केली. ती मुलगी आता ४५ व्या वर्षांतही निरोगी जगत आहे, याचे समाधान आहे. तंत्रज्ञानाने गर्भावस्थेत अर्भकाच्या दोषाचे निदान होते. हा दोष गर्भातच अथवा जन्मानंतर दूर होईल, यादृष्टीने डॉक्‍टरांकडून गर्भाशयात व गर्भाशयाबाहेर काढून ‘फीटल’ शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याचे प्रमाण भारतात फार नसले तरी ते विकसित होत असल्याचे असे डॉ. दलाल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com