कारवाईच्या धास्तीने डॉक्‍टरची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पाचोड - उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत अश्‍लील चाळे करणाऱ्या डॉक्‍टरने पोलिस कारवाई व पीडित मुलीच्या नातेवाइकांच्या धास्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. 17) रात्री आठच्या सुमारास कौंदर (ता. पैठण) येथे घडली.

पाचोड (ता. पैठण) येथील पंधरावर्षीय मुलगी आपल्या आजीच्या अंत्यविधीसाठी वडिलांसोबत मामाच्या गावी नांदर (ता. पैठण) येथे गेली. अंत्यविधीनंतर ती मामाकडेच थांबली. गुरुवारी (ता. 17) सायंकाळी पोट दुखत असल्याने ती मामीसोबत नांदर येथील डॉ. विजय विठ्ठल गिरी याच्या रुग्णालयात उपचारासाठी गेली. त्या वेळी डॉ. गिरी (वय 45, रा. कौंदर) याने मुलीला तपासणीसाठी पलंगावर झोपवून तिच्यासोबत अश्‍लील चाळे केले. मुलीने तातडीने हा प्रकार मामीला सांगितला. मामी व भाच्चीने घर गाठून नातेवाइकांना प्रकार सांगितला. ही बाब डॉ. गिरीला कळताच त्याने रुग्णालय बंद करून कौंदर येथे घराकडे पलायन केले. मुलीच्या कुटुंबीयांनी कौंदर येथे त्याच्या घरी जाऊन जाब विचारण्याचा निर्णय घेतला असता, त्याने पुन्हा नांदर येथील रुग्णालय गाठले. नातेवाईक रुग्णालयाकडे निघाल्याचे कळताच भीतीपोटी डॉ. गिरी याने कौंदर येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, पीडित मुलगी वडील व मामासोबत पोलिस ठाण्यात पोचली. त्यांनी संबंधित डॉक्‍टरविरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: doctor suicide