एकाच कुत्र्याने घेतला अनेकांना चावा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

औरंगाबाद - सध्या शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, विविध भागांतील 19 जणांना चावा घेतल्याची घटना शनिवारी (ता. 17) सायंकाळी घडली. सर्वाधिक चावा घेतल्याचे रुग्ण शहानुरमियॉं दर्गा परिसरातील आहेत. जखमी झालेल्या रुग्णांवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात मुक्‍तसंचार सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. शनिवारी सायंकाळी शहानुरमियॉं दर्गा परिसरात तब्बल दहा जणांना एकाच मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला. याची माहिती परिसरात पसरताच भीतीचे वातावरण निर्माण झाले. यात जखमी झालेल्यापैकी काही जणांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच शहरातील ज्योतीनगर, नंदूरबार टेकडी, निजानगणी कॉलनी, शंभुनगर, गजानन महाराज मंदिर परिसरातही कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे घाटीतील डॉक्‍टरांनी सांगितले. एकाच वेळी अचानक मोठ्या प्रमाणात कुत्रा चावलेले रुग्ण आल्याने सर्जरी विभागातील डॉ. बीडकर हे तातडीने रुग्णालयात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत अशा रुग्णांना इंजेक्‍शन देण्याचे काम सुरू होते.

या प्रकारामुळे लहान मुलांना घराबाहेर खेळण्यास जाऊ द्यायचे की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असताना महापालिका प्रशासन झोपा काढते का, असा प्रश्‍न जय विश्‍वभारती कॉलनी येथील नवनाथ भिवरे यांनी उपस्थित केला. केवळ महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर फिरण्याचीही भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया प्रमोद नांगरे यांनी व्यक्‍त केली.

Web Title: dog bite