कुत्र्याने तोडले तीन बालकांचे लचके

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - पिसाळलेल्या कुत्र्याने गल्लीमध्ये खेळत असलेल्या तीन बालकांना चावा घेतल्याची घटना शनिवारी (ता. चार) सायंकाळी कटकट गेट भागात घडली. या बालकांना घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्‍टर वेळेवर न आल्याने व रेबीज लस उपलब्ध नसल्याने नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला. 

कटकट गेट येथील मोगल हॉटेलजवळील गल्लीमध्ये सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सहा ते सात बालके खेळत होती. यावेळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने यातील एका बालकाला चावा घेतला. त्यानंतर सर्व मुले घाबरून रडू लागली. पाहता पाहता कुत्र्याने आणखी दोन बालकांना चावा घेतला. मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून नागरिक बाहेर आले. त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून बालकांची सुटका केली. 

शेख अरफास, शेख रज्जाक (वय साडेतीन वर्षे), शेख अब्दुल रहेमान (वय सहा वर्षे) या तीनही बालकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यातील दोघांना डॉक्‍टरांनी घाटीत नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नातेवाइकांनी दोघांना घाटीत दाखल केले.

तब्बल दीड तासानंतर आले डॉक्टर
बालकांना घाटी नेले असता तेथे डॉक्‍टरच उपलब्ध नव्हते. तब्बल दीड तासानंतर डॉक्‍टर आले. बालकांना तपासताना लसच उपलब्ध नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. रेबीज लस उपलब्ध होईपर्यंत रात्रीचे दहा वाजले. त्यामुळे नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला. एका बालकाच्या नाकाला कुत्र्याने चावा घेतला असून, त्याचे नाव मात्र समजू शकले नाही.

Web Title: dog bites three babies

टॅग्स