कुत्रे सुसाट, करार संपुष्टात

Dog
Dog

औरंगाबाद - शहरात कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच महापालिकेने कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी एजन्सीसोबत केलेला करार ३१ मार्चला संपत आहे. त्यामुळे महापालिकेवर नवे संकट ओढवले आहे. आता नवीन एजन्सीच्या नियुक्तीसाठी धावपळ सुरू आहे.  

शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सध्या सुमारे ४० हजार कुत्रे शहरात असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे कुत्रे चावल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान महापालिकेने एप्रिल २०१८ मध्ये पुणे येथील ब्लू क्रॉस या संस्थेला कुत्रे पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे काम दिले; मात्र अद्याप मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न संपलेला नाही.

महापालिकेने या संस्थेसोबत केवळ एकच वर्षाचा करार केला होता. त्याची मुदत ३१ मार्चला संपत आहे. त्यामुळे प्रशासनाने नव्या एजन्सीचा शोध सुरू केला आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून या कामांचा अनुभव असणाऱ्या संस्था, एजन्सींनी निविदा दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निविदा दाखल करण्याची पाच मार्च ही तारीख होती. मात्र केवळ एकच निविदा दाखल झाली आहे.

त्यामुळे प्रशासनाने अल्पमुदतीची निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, शहरात मोकाट कुत्र्यांनी वर्षभरापासून धुमाकूळ घातलेला आहे. कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या दररोज वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com