"इज ऑफ डुइंग'च्या घसरगुंडीला अभ्यास गटाचा उतारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

औरंगाबाद - "इज ऑफ डुइंग बिझनेस'च्या यादीत महाराष्ट्राच्या झालेल्या घसरगुंडीला अभ्यास गटाचा उतारा राज्य सरकारतर्फे दिला जाणार आहे. धोरणातील कमतरता आणि त्यांच्या अंमलबजावणीत कसूर करणाऱ्यांना शोधण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या औद्योगिक धोरण आणि प्रसारने (डीआयपीपी) जाहीर केलेल्या "इज ऑफ डुइंग बिझनेस'च्या मानांकन यादीत महाराष्ट्र अव्वल दहामध्येही राहिलेला नाही. उलट महाराष्ट्राला मागे टाकत आंध्र आणि नव्या अशा तेलंगणा आणि पंतप्रधानांच्या गुजरात राज्यांनी महाराष्ट्रापुढे मजल मारली आहे. याविषयी विचारणा केली असता, केंद्राने ही मानांकन यादी तयार करताना अर्धेच निकष लावल्याचा आरोप उद्योगमंत्री देसाई यांनी केला.
गुंतवणूकदारांचा महाराष्ट्राकडे कल

"इज ऑफ डुइंग बिझनेस'च्या सर्वेक्षणात महाराष्ट्र तेराव्या स्थानी गेला असला तरी देशांतर्गत आणि परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसरच असल्याचा दावा उद्योगमंत्र्यांनी केला. परकीय गुंतवणुकीचे आकडे रिझर्व्ह बॅंक जाहीर करते. यात महाराष्ट्राने गेल्या वर्षांत 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक मिळवल्याचे स्पष्ट केले आहे. गुंतवणूकदार राज्यांचा अभ्यास करून निर्णय घेतात. यापूर्वी महाराष्ट्राला याचा चांगला अनुभव आला आहे. उलट या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा माहिती उपलब्ध करून देण्यात, पारदर्शक कारभारात अव्वल क्रमांक असल्याचा दावा श्री. देसाई यांनी केला.

Web Title: Is of doing business study maharashtra state government subhash desai