दानपेट्यांतील जुन्या नोटा मंदिराकडेच ठेवाव्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

तुळजाभवानी मंदिर समितीला "प्राप्तिकर'ची सूचना

तुळजापूर - तुळजाभवानी देवस्थान समितीने भाविकांकडून दानपेटीत देणगी स्वरूपाने आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मंदिराकडे ठेवाव्यात अशा सूचना प्राप्तिकर विभागाकडून आल्या आहेत. त्याला मंदिर समितीकडून दुजोरा मिळाला आहे.

प्राप्तिकर विभागाकडून शुक्रवारी (ता. 2) देवस्थानला आलेल्या सूचनेत म्हटले आहे की, रोज जमा झालेल्या नोटा एकत्र करून पुढील आदेश येईपर्यंत त्या तशाच ठेवाव्यात. तुळजाभवानी देवस्थान समिती लेखा विभाग आणि धर्मादाय विभागाच्या समक्ष दानपेट्यांतील रक्‍कम मोजण्याची पद्धत आहे. त्यानंतर देवस्थान समितीची रक्‍कम बॅंकांमध्ये जमा होते. नोटाबंदीनंतर आलेल्या वेगवेगळ्या सूचनांची अंमलबजावणी समिती करीत आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद झाले असले तरीही दानपेटी आणि गुप्तदान पेटीत भाविक नेमकी कशी रक्कम अर्पण करतात हे पाहणे आणि देणगी नाकारणे अशक्‍य असते. दरम्यान, दानपेटींत आलेल्या सर्व नोटा जमा करून ठेवण्याचे काम सुरू आहे. जुन्या नोटा येण्याचे प्रमाणही अलिकडे कमी झाले आहे. प्राप्तिकर विभागाच्या सूचनांचीही योग्य अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी सरव्यवस्थापक सुजित नरहरे यांनी सांगितले.

Web Title: donation box old currency keep to temple