अशा महिलांना तुमचे दागिने देऊ नका, नाही तर असं होईल

 Don't give your jewelry to such women ...
Don't give your jewelry to such women ...

औरंगाबाद - घरोघरी फिरून जुन्या भांड्यांच्या बदल्यात नवीन भांडी तयार करून देत विश्‍वास संपादन करायचा. त्यानंतर भांड्याप्रमाणेच जुने दागिन्यांच्या बदल्यात जास्त किमतीची दागिने तयार करुन देण्याचे आमिष दाखवून एक महिला घरोघरी गेली अन.. दोन महिलांचे 73 हजार 500 रुपयांचे दागिने घेऊन ती पसार झाली. हा प्रकार औरंगाबादेतील चेतनानगर, हर्सूल भागात घडला. त्यामूळे अशा महिला दागिने मागायला आल्यास त्यांना थारा देऊ नका. 

अनिता आदमाने चेतनानगरातील हर्सूल भागात राहतात. सहा नोव्हेंबरला सकाळी एक महिला त्यांच्याकडे आली. तिने घरातील जुन्या भांड्यांचा वापर करून हवी ती नवी भांडी तयार करून देते, असे सांगितले. यामुळे अनिता आदमारे यांनी काही भांडी तिला दिली होती. दुसऱ्याच दिवशी तिने नवीन मोठे पातेले अनिता आदमाने यांना आणून दिले.

यानंतर तिने अशीच भांडी देत अनेक महिलांचा विश्‍वास संपादन केला. नऊ नोव्हेंबरला ती पुन्हा अवतरली. यावेळी ती दुसऱ्या महिलेकडे गेली. तिथे अनिता आदमाने याही आल्या. त्यावेळी भामट्या महिलेने सोन्याचे दागिने मला दाखवा. मी त्यावर नक्षीचा फोटो घेऊन जास्त किमतीचे दागिने देते असे आमिष दाखविले.

नवीन भांडी देत असल्याने अनिता आदमाने व त्यांच्या शेजारील महिलेनेही तिच्यावर विश्‍वास ठेवला. दोघींनी ठुशी, कर्णफुले, नेकलेस, सोन्याच्या दोन पोती, चांदीचे जोडवे, डोरले असे दागिने थापाड्या महिलेच्या हाती सोपविले. ती गेली; परंतु नंतर ती पुन्हा फिरकली नाही. फसवणूक झाल्याने अनिता आदमाने व त्यांच्या शेजारी महिलेने हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. पण तुमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com