डॉ. भोसले यांनी घेतला स्वारतीम विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

नूतन कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडून कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली.

नांदेड - विद्यापीठाला प्रगतीच्या शिखरावर नेणे हे माझे ध्येय असून, सर्वच क्षेत्रात विद्यापीठाचे नाव उंचावण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मत डॉ. भोसले यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर आयोजित सत्कार सभारंभात व्यक्त केले.

नूतन कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडून कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली, त्यानंतर विद्यापीठ आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

याप्रसंगी कुलसचिव डॉ.रमजाण मुलानी,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, यांच्यासह सिनेट सदस्य, विद्यापीठाचे अधिकारी,शैक्षणिक संकुलांचे संचालक आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. Bhosale took charge as Vice-Chancellor of Swaratim University