डॉ. पानतावणेंच्या सल्ल्यानेच भीमशक्तीचा प्रयोग - रामदास आठवले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

औरंगाबाद - राजकारणात विचारधारेच्या विरोधातही निर्णय घ्यावे लागतात, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दिला होता. त्याप्रमाणेच शिवशक्ती- भीमशक्तीचा प्रयोग करीत शिवसेनेबरोबर युती केली, असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे स्पष्ट केले. 

डॉ. गंगाधर पानतावणे यांना अभिवादन आणि "अस्मितादर्श'च्या अर्धशतकपूर्ती सोहळ्याच्या उद्‌घाटनप्रसंगी आठवले बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक मधुकरअण्णा मुळे अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, श्रीपाल सबनीस, डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रेमानंद गज्वी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आठवले म्हणाले, की आंबेडकरी विचारधारेला वाहून घेतलेले डॉ. पानतावणे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आंबेडकरी साहित्य रुजविण्यासाठी काम केले. त्यांच्या "अस्मितादर्श'ने अनेक लेखक- साहित्यिक, कवी, कथाकार घडवले. 

सबनीस यांनी कॉंग्रेस व भाजप सरकारवर टीका केली. कॉंग्रेसने घोटाळे केले नसते, तर जनतेला नको असलेले भाजप सरकार सत्तेवर आले नसते, असे ते म्हणाले. डॉ. पानतावणे यांच्या "अस्मितादर्श'ने एका जातिधर्माचा गोतावळा जमा न करता सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम केले. 

भाजप सरकारच्या कार्यकाळात अन्याय- अत्याचार वाढले आहेत. संभाजी भिडे हे विकृतीचे प्रतीक आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोणत्या आधारावर क्‍लीन चिट दिली, असा सवाल डॉ. मुणगेकर यांनी केला.

Web Title: Dr. pantawne advice to Bhima Shakti experiment says Ramdas Athawale