लातूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. शिवाजी सुक्रे 

हरी तुगावकर
Sunday, 26 July 2020

नंदूरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची येथे अधिष्ठाता म्हणून बदली झाली आहे.

लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय  विज्ञान संस्थेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून बदली करण्यात आली आहे. तर नंदूरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची येथे अधिष्ठाता म्हणून बदली झाली आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्याकडे गेल्या दहा महिन्यापासून अधिष्ठाता पदाच अतिरिक्त कार्यभार होता. गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालला आहे. कोरोना बाधितांवर उपचार करण्याची मोठी जबाबदारी या संस्थेवर येवून पडली. या कालावधीत डॉ. ठाकूर यांनी चांगले काम केले. पण आता शासनाने त्यांची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून बदली केली आहे. येथेही त्यांचा अतिरिक्त कार्यभारच असणार आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

सध्या नंदूरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अतिरिक्त कार्यभार असलेले अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे देखील येथील अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभारच असणार आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!  

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत अधिष्ठाता म्हणून गेली दहा महिने चांगले काम करता आले. याच संस्थेत मी कान, नाक व घसा विभागाचा प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. सध्या आईची तब्येत ठीक नसल्याने आपण शासनाला येथेच मुळ पदावर बदली करावी अशी विनंती केली आहे.

डॉ. गिरीष ठाकूर, अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था.

(संपादन-प्रताप अवचार) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Shivaji Sukre Appointment Dean of Latur Medical College