डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांना हिंदी सेवी पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

लातूर - मराठी साहित्य हिंदी भाषेतून अधिकाधिक वाचकांसमोर आणणारे आणि अनुवादाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांना केंद्र सरकारच्या केंद्रीय हिंदी संस्थेचा मानाचा "गंगाचरण सिंह हिंदी सेवी पुरस्कार' जाहीर झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जून महिन्यात दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पाच लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हिंदी भाषा व प्रशिक्षणासाठी केंद्र सरकारची आग्रा येथील "केंद्रीय हिंदी संस्था' ही सर्वोच्च संस्था कार्यरत आहे.
Web Title: dr. suryanarayan ransubhe hindi sevi award