साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांना 'डॉ. यशवंत मनोहर पुरस्कार' जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

"कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे,'' अशा वेगवेगळ्या कवितांमधून दाहक वास्तव आणि कमालीची संवेदनशीलता व्यक्त करणारे ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरू केला आहे. पहिलाच पुरस्कार लातूरमधील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांना जाहीर झाला आहे.

लातूर - "कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे,'' अशा वेगवेगळ्या कवितांमधून दाहक वास्तव आणि कमालीची संवेदनशीलता व्यक्त करणारे ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरू केला आहे. पहिलाच पुरस्कार लातूरमधील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांना जाहीर झाला आहे.

डॉ. मनोहर यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने त्यांच्या विद्यार्थ्यांनी दहा लाख रुपये जमा केले आहेत. या निधीतून डॉ. मनोहर यांच्या नावाचा पुरस्कार परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी असलेल्या व्यक्तीला दरवर्षी दिला जाणार आहे. यंदाच्या पाहिल्याच पुरस्कारासाठी उपेक्षितांचे अंतरंग जाणून घेऊन लेखन करणारे डॉ. वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. 

डॉ. यशवंत मनोहर अमृत महोत्सव समिती, डॉ. यशवंत मनोहर पुरस्कार समिती आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने या पुरस्काराचे वितरण नागपूर येथे 3 जून रोजी होणार आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Dr. Yashwant Manohar Award declared for Dr. Janardan Waghmare