सहा हजार 641 ग्रामपंचायतींनी मंजूर केले प्रारूप विकास आराखडे 

सहा हजार 641 ग्रामपंचायतींनी मंजूर केले प्रारूप विकास आराखडे 

औरंगाबाद - चौदाव्या वित्त आयोगाचा निधी मिळविण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार "आमचं गाव, आमचा विकास' या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींना विकास आराखडा तयार आदेश देण्यात आले होते. वित्त आयोगाचा कालावधी 2015-16 ते 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता राहणार असून, पंचवार्षिक बृहत्‌ विकास आराखडा व दरवर्षी वार्षिक कृती आराखडा या दोन प्रकारे ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करायचा आहे. मराठवाड्यात एकूण सहा हजार 643 ग्रामपंचायती असून, यापैकी 6 हजार 641 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन प्रारूप आराखडे मंजूर केले आहे. आत्तापर्यंत प्रारूप विकास आराखड्यानुसार 29 हजार 399 प्रकल्प अहवाल तयार झालेले आहे. 

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा लोकसहभागातून विकास आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने "आमचं गाव-आमचा विकास' योजना राबविली जात आहे. चौदावा वित्त आयोगाचा निधी हवा असेल तर ग्रामपंचायतींना विकास आराखडा तयार करणे आवश्‍यक करण्यात आले. या आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर निधी प्राप्त होत आहे. 

ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यात गावातील शेतकरी, अनुसूचित जाती-जमाती, महिला, युवक-युवती, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक, अशा घटकांशी विविध स्तरांवर विचारविनिमय करण्यात आला आहे. लघुसिंचन, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक वनीकरण, लघु व कुटीर उद्योग, पिकाचे पाणी, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, इमारती व दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि अपारंपरिक ऊर्जा या चौदा विषयासंबंधीच्या मूलभूत सेवा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आलेली आहे. गावाच्या विकासात चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीची खूप मोठी मदत होत आहे. 

प्रारूप आराखड्याची तांत्रिक समितीकडून छाननी 
मराठवाड्यात सहा हजार 643 ग्रामपंचायतींनी "आमचं गाव आमचा विकास'ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सहा हजार 641 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन प्रारूप आराखडे तयार केले आहे. प्रारूप विकास आराखड्यानुसार 45 हजार 248 प्रकल्प अहवाल तयार करायचे आहे. यामध्ये आत्तापर्यंत 29 हजार 399 प्रकल्प अहवाल तयार झालेले आहे. सहा हजार 635 ग्रामपंचायतींनी प्रारूप आराखडे तालुकास्तरीय तांत्रिक समितीकडे पाठविले आहे. तांत्रिक समितीने या आराखड्याची छाननी केली आहे. तर सहा हजार 635 ग्रामपंचायतींच्या अंतिम विकास आराखड्यास ग्रामसभेने मंजुरी दिलेली आहे. 

मराठवाड्यातील आमचा गाव आमची विकासाची स्थिती 
जिल्हा परिषद...............एकूण ग्रामपंचायती................प्रारूप विकास आराखड्यानुसार तयार केलेले प्रकल्प अहवाल 
औरंगाबाद........................861.................................2492 
जालना...........................779..................................4984 
परभणी..........................704....................................7434 
हिंगोली...........................563...................................4032 
नांदेड.............................1309.................................3209 
बीड...............................1023..................................2278 
लातूर..............................783.....................................3725 
उस्मानाबाद........................621....................................1245 
एकूण.............................6643..................................29399

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com