गोल्डन कार्ड मिळण्याचे स्वप्न भंगणार ! 

योगेश पायघन
सोमवार, 3 डिसेंबर 2018

औरंगाबाद : गाजावाजा करुन सुरु झालेली महत्वाकांक्षी "आयुषमान भारत" योजनेत जिल्ह्यातील अडिच लाख लोकांना लाभ मिळणार असल्याचा ठोल बडवला जात आहे. मात्र, ज्या सामाजीक आर्थिक जात सर्वेक्षणातुन या लाभार्थ्यांची निवड झाली त्या सर्व्हेक्षणावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लाभार्थींच्या यादीत नावेच सापडत नसल्याने आयुष्यमानच्या विमा संरक्षणात आरोग्यदायी "गोल्डन'कार्ड मिळण्याचे स्वप्न भंगणार आहे. 

औरंगाबाद : गाजावाजा करुन सुरु झालेली महत्वाकांक्षी "आयुषमान भारत" योजनेत जिल्ह्यातील अडिच लाख लोकांना लाभ मिळणार असल्याचा ठोल बडवला जात आहे. मात्र, ज्या सामाजीक आर्थिक जात सर्वेक्षणातुन या लाभार्थ्यांची निवड झाली त्या सर्व्हेक्षणावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लाभार्थींच्या यादीत नावेच सापडत नसल्याने आयुष्यमानच्या विमा संरक्षणात आरोग्यदायी "गोल्डन'कार्ड मिळण्याचे स्वप्न भंगणार आहे. 

आयुष्मान भारत योजनेला 23 सप्टेंबरला सुरुवात झाली. त्याच्या लाभार्थ्यांची लिस्ट 15 ऑक्‍टोबरला मिळाली. जिल्हा परिषदे सह महापालीकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण व यादी बनवण्याचे काम चोख बजावल्याचे सांगण्यात येते मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती उलटी असल्याचे वेबसाईटवर नावांचे सर्चींग केल्यावर लक्षात येते. मराठवाड्यात इतरही शासकीय रुग्णालयात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. ई-कार्ड जनरेट होण्याची आकडेवारी दररोज नॅशनल हेल्थ एजन्सी जाहीर करत आहे. त्यात मराठवाड्यातील चित्र मात्र विदारक असल्याचे समोर येत आहे. 

तिघांना प्राथमिक मान्यता 
मराठवाड्यातुन शासकीय कर्करोग रुग्णालयात 109 रुग्णांचे प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या (पीएम-जेएवाय) वेबसाईटवर एन्‍रॉलमेंट झाले. त्यातील साठ अर्जांना ऍप्रुव्हल मिळाले. तर 49 अर्ज रिजेक्‍ट झाले. तर घाटीत 122 जणांनी नाव नोंदणी केली. त्यातील 100 लोकांना एप्रुव्हल मिळाले तर 18 अर्ज रिजेक्‍ट झाले. तर चार अद्याप पेंडींग स्टेटस दाखवत आहे. अप्रुव्हल मिळालेल्या रुग्णांना उपचार देण्याचे सुचना अद्याप मिळाल्या नसल्याने आतापर्यंत प्राथमिक मान्यता मिळालेल्या तीन कर्करोग रुग्णांनाही आयुष्मान होण्याची वाट पहावी लागत आहे. बिहार मधील एका रुग्णाला कर्करोग रुग्णालयात उपचार मिळाले मात्र, पिएमओ ऑफिसकडुन उपचाराच्या सुचनेनंतर त्या रुग्णावर उपचार झाले असल्याचेही समोर आले. 

जीवनदायीचे काम बरे 
जीवनदायी अर्थात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन(एमएफ-जेएवाय) जिल्ह्यात रुग्णांना चांगला लाभ होत आहे. आरोग्यमित्रांची मदतीने 23 रुग्णालयांमध्ये हि सुविधा दिल्या जात आहे. टार्गेट ओरीएंटेड काम पॅनलवरील रुग्णालयांनी न केल्यास त्यांना पॅनलवरुन काढुनही टाकल्या जात असल्याच्या कारवाई केल्या जात आहे. गेल्या महिन्यात चार रुग्ण पॅनलवरुन कमी झाल्याचे जिल्हा समन्वयक डॉ. योगेश लोखंडे म्हणाले. 

अडीच महिन्यात 231 जणांची नोंदणी 
घाटी व कर्करोग या दोन रुग्णालयात सध्या आयुष्यमान योजना कार्यान्वीत आहे. येथे 231 रुग्णांचे इन्‍रॉलमेंट झाले. त्यापैकी 160 प्रकरणे अप्रुव्ह झाले तर चार प्रकरणे पेंडींग तर 67 प्रकरणे नामंजुर झाली. कर्करोग रुग्णालयात तीन रुग्णांना उपचाराची प्राथमिक मान्यता मिळाल्याची माहीती महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. योगेश लोखंडे यांनी दिली.

Web Title: dream will be break of golden card by ayushyaman bharat