ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल- डॉ. रेड्डी यांचे मत; लोदग्यात ड्रोनची प्रात्याक्षिक

Drone demonstration at Lodaga Latur
Drone demonstration at Lodaga Latur

लातूर - वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे. यात
शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेवून बंगळुरुच्या भारतीय विज्ञान संस्थेने ड्रोन विकसित केले आहेत. हे ड्रोन पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल, असा विश्वास बंगळुरुच्या भारतीय विज्ञान
संस्थेचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. के. पी. जे. रेड्डी यांनी व्यक्त केले.

लोदगा (ता. औसा) येथील सर छोटुराम कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात भारतीय विज्ञान संस्था व फिनिक्स फाऊंडेशन वतीने सोमवारी (ता. २४) कृषि ड्रोनची प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. हे प्रात्याक्षिके पाहण्यासाठी जिल्ह्यातून शेतकरी आले होते. तसेच भारतीय विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. जी. गोपालन, एस. एन. ओमकार, केंद्र शासनाच्या नागरी उड्डायन मंत्रालयाचे उपसंचालक तुलसीरमन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे नवीद पटेल, महाराष्ट्र बांबू बोर्डाचे डॉ. थंग रेड्ड़ी, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकास रस्तोगी, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदींची उपस्थिती होती. श्री. पटेल यांच्या पुढाकारातून या प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

शेतात तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय शेती सुधारणे अशक्य आहे. भारतीय
विज्ञान संस्थेने हे ड्रोन विकसित केले आहे. या ड्रोनच्या सहाय्याने
कोणते पीक किती एकरवर पेरले गेले आहे, याचा अचूक अंदाजे घेता येईल,
कोणत्या पिकावर कोणती किड पडली आहे, याची माहिती मिळेल, शेतकऱयांनी कोणते पीक घेवू नये याची माहिती सांगता येईल, कोणत्या विभागात कोणते पीक घ्यावे याची माहिती सांगता येईल इतकेच नव्हे तर ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करणेही शक्य होणार आहे. इस्त्राईलमध्ये याचा सर्रास वापर केला जात आहे. तसाच वापर येथे व्हावा या करीता प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती श्री. रेड्डी यांनी दिली.

या ड्रोनच्या वापरासाठी भारतीय विज्ञान संस्था व राज्य शासन यांच्या करार
होत आहे. दोन वर्ष याचा येथे वापर सुरु होईल, अशी माहिती श्री. गोपालन
यांनी दिली. यातील एक ड्रोन ५० किलोमीटर तासी वेगाने वीस किलोमीट
परिसरातील शेतीवर निरक्षण करु शकते अशी माहिती श्री. ओमकार यांनी दिली. शेतीच्या क्षेत्राच्या विकसासाठी ड्रोन हा आशेचा किरण आहे, असे श्री.
पटेल म्हणाले.

ड्रोनचा कायदा तयार:
केंद्र शासनाने ड्रोनचा कायदा तयार केला आहे. यात शेतीसाठी ड्रोनचा वापर
करायचा असेल तर त्याला तातडीने अॉनलाईन परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती नागरी उड्डायण मंत्रालयाचे उपसंचालक तुलसी रमण यांनी दिली. ड्रोनसाठी रेड, येलो व ग्रीन असे झोन तयार करण्यात आले आहेत. शेतीही ग्रीन झोनमध्ये येते. ड्रोनच्या उड्डानासाठी परवानगी आवश्यकच आहे. आॅनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे. शेतीसाठी ती सहज उपलब्ध असणार आहे. ४०० मीटर उंचीपर्यंतच ड्रोन उडवता येणार आहे. विवाहसाठीच्या ड्रोनची ही मर्यादा २०० मीटर उंचीपर्यंतच आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com