नांदेड शहरावर ड्रोनचे लक्ष, १६६ जणांविरुद्ध गुन्हे- डीवायएसपी फस्के

फोटो
फोटो

नांदेड : कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. हा आजार पसरणार नाही यासाठी शासनाकडून जमावबंदी लागु करण्यात आली. मात्र जमावबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या आजपर्यंत १६६ जणांविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारपासून (ता. ३०) शहरात आता ड्रोन कॅमेरा लक्ष ठेवणार आहे. येणाऱ्या काळात कठोर पाऊले उचलण्यात येणार असल्याचे पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के यांनी सांगितले. 

देशासह राज्यातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी (ता. २२) मार्च रोजी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचे आदेश लागू केले होते. संचारबंदीचे आदेश लागू असल्याने महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असे असताना संचारबंदी आदेश तब्बल १९ जणांनी धुडकावले. संचारबंदीचा भंग केला. त्यामुळे संबंधितांविरुद्ध विविध नांदेड ग्रामिण आठ, इतवारा दोन, वजिराबाद सहा, शिवाजीनगर दोन आणि मरखेल पोलिस ठाण्यात एक असे १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सावधान - ड्रोनचे आहे लक्ष 

नांदेड शहरात लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्‍यक सेवेतील व्याक्तीशिवाय अन्य व्यक्ती कामाशिवाय घराबाहेर पडत आहेत. त्यांच्यावर काडक कारवाई करण्यात येत आहे. तरीही नागरिक काही ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना त्रासुन सोडत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी आता ड्रोन कॅमेरा लक्ष ठेवणार आहे. सोमवारी (ता. ३०) दुपारी तीन वाजता वजिराबाद चौकातून हा ड्रोन सोडण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांची उपस्थिती होती.  

१६६ जणांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे 

यात ता. २२ मार्च रोजीचा जनता कर्फ्यू मोडणाऱ्या २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.  ता. २३ मार्च रोजी संचारबंदीचे आदेश धुडकावणाऱ्या १३ जणांविरूद्ध,  ता. २४ मार्च रोजी १८ जणांविरुद्ध तर ता. २५ मार्च रोजी सात जणांविरुद्ध, ता. २६ मार्च सहा, २७ मार्च रोजी १३, ता. २८ मार्च रोजी पाच, ता. २९ मार्च रोजी ६५ आणि ता. ३० मार्च रोजी १९ अशा एकूण १६६ जणांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भविष्यातही संचारबंदीचे आदेश धुडकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या लॉकडाउनचा भंग करणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

 येथे क्लिक कराविनाकारण फिरु नका, वाहने जप्त करू : डॉ. विपिन ​
उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षाचा कारावास

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षाचा कारावास आणि रोख रकमेचा दंड ठोठावला जाऊ शकतो.  त्यामुळे सुजाण नागरिकांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनला पूर्णपणे सहकार्य करावे. पोलिस, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com