दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दहा रुपयांत जेवण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मोकळ्या जागेत हे भोजन गृह सुरू करण्यात आले. परळीत धान्य खरेदी-विक्री, शेतीविषयक व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना इथे 10 रूपयांमध्ये जेवण मिळणार आहे.

परळी : परळी शहरात कामानिमित्त येणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ 10 रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानतर्फे हाती घेतलेल्या या शेतकरी उपयोगी उपक्रमाची सुरुवात गुरुवारी (ता. 15) मुंडे यांच्या हस्ते झाली.

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मोकळ्या जागेत हे भोजन गृह सुरू करण्यात आले. परळीत धान्य खरेदी-विक्री, शेतीविषयक व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना इथे 10 रूपयांमध्ये जेवण मिळणार आहे. तशी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असते. त्यातच दुष्काळाने शेतकरी अधिकच पिचलेला असल्याने त्यांच्यासाठी हा मोठा दिलासादायक उपक्रम आहे. 

या उपक्रमासाठी अ‍ॅड. मनजीत सुगरे व रंगनाथ सावजी यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी चंदुलाल बियाणी, डॉ. संतोष मुंडे, वाल्मिक कराड, सुरेश टाक, श्री. रामदासी, राजेभाऊ पौळ, गजानन पारेकर आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought affected farmers get food in only ten rupees