दुष्काळाचा पहिला हप्ता बॅंका शेतकऱ्यांना देईनात

Bank
Bank

सोयगाव - महसूल प्रशासनाकडून आठवडा उलटूनही जमा झालेली दुष्काळाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम बॅंका देण्यास टाळाटाळ करत असल्याने तालुक्‍यात अद्याप एकाही शेतकऱ्याला दुष्काळाचा निधी मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. बॅंकांनी याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा सुरू आहे.

तहसील प्रशासनाकडून आठवडाभरा पूर्वीपासून १४ हजार ३७० शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळाच्या नुकसानीची पाच कोटी ऐंशी लाख इतकी रक्कम गावनिहाय बॅंकांना पाठविली आहे. सदरील रक्कम बॅंकांना पाठवून दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. 

अद्यापही खात्यावर रक्कम वर्ग झाली नसल्याचे बॅंकांकडून सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना बॅंकेत चकरा माराव्या लागत आहेत. दुष्काळाच्या नुकसानीच्या पहिल्या हप्त्यात नुकसानीच्या पन्नास टक्के इतकी रक्कम शासनाने शेतकऱ्यांना दिली आहे. यामध्ये तब्बल १४ हजार ३७० शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचा लाभ मिळाला असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात बॅंका मात्र शेतकऱ्यांना अद्याप रक्कम जमा झाली नसल्याची उत्तरे देत असल्याने शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात रक्कम मिळत नाही.

बॅंक व्यवस्थापकाचा असहकार 
जरंडी (ता. सोयगाव) येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत मात्र संबंधित व्यवस्थापक शेतकऱ्यांना खात्यावर जमा झालेल्या दुष्काळाच्या रकमेबाबत योग्य मार्गदर्शन करीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सदरील व्यवस्थापकाच्या मनमानीचा फटका बसत आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रवीण पांडे यांना तोंडी स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत.

बॅंकनिहाय जमा झालेली रक्कम
  बनोटी - जिल्हा बॅंक शाखा - ११,२४,९२४ रु., 
महाराष्ट्र बॅंक शाखा - ४६,६७,४१८ रुपये 
 गोंदेगाव - महाराष्ट्र बॅंक - ५५,८०, ८९६ रु., 
जिल्हा बॅंक - तीस लाख २६२, 
  फर्दापूर - जिल्हा बॅंक-८७,२१,२६८ रु., महाराष्ट्र बॅंक-११,५७,८९८ रु. 
  सोयगाव - जिल्हा बॅंक-८६,७९,७९२ रु., महाराष्ट्र बॅंक-२०,९७,३५८ रु. 
  सावळदबारा - जिल्हा बॅंक-७,४९,५९८ रु., ग्रामीण बॅंक-८१,६९,०१० रु.(जरंडी येथील बॅंकांतील रकमेचा तपशील मिळू शकला नाही)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com