बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र

File photo
File photo

शिरूर कासार (जि. बीड) - यंदा पावसाळ्याचे दोन ते अडीच महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी हावालदिल झाला आहे. अद्यापही चारा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना गोदाकाठचा ऊस चारा म्हणून विकत घ्यावा लागत आहे.

 
यंदा मॉन्सूनपूर्व पाऊस झालाच नाही. तालुक्‍यात समाधानकारक पाऊस नसल्याने नद्या-तलाव, कोरडेच दिसून येत आहेत. त्यामुळे खरिपाची पिके धोक्‍यात आली आहेत. तालुक्‍यातील साठ हजार पशुधनाची दावणीवर उपासमार होत आहे. शेतकऱ्यांनी साठविलेला चारा संपुष्टात आला आहे.

खरिपात चाऱ्याची पेरणी केली; पण पाऊस नसल्याने वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकरीवर्गाला पशुधनाच्या चाऱ्यासाठी गोदावरी पट्ट्यात पाच हजार रुपये टनाने ऊस खरेदी करावा लागत आहे. हा चारा परवडत नसल्याने पशुधनावर उपासमारीची वेळ आली आहे. पशुधनाला कडूनिंबाच्या झाडाचा पाला खाण्याची वेळ आली आहे. तालुक्‍यात ठराविक गावात शंभर टॅंकरच्या खेपा टाकल्या जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी टॅंकर नसल्याने पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 


शिरूर तालुक्‍यात लहान-मोठी साठ हजार जनावरे आहेत. 52 छावण्यांमध्ये 42 हजार जनावरे होती. पुन्हा चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com