पुरेसे मिळेना पाणी, खायचाही वांधा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

औरंगाबाद - पावसाने दगा दिल्याने हातची पिके गेली. आता माणसांसह जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने गंभीर स्थिती आहे. शासन प्रतिव्यक्ती वीस लिटर पाणी देते. गाव आता पाणदमुक्‍त झाल्याने पाण्याची गरज वाढून प्रतिव्यक्‍ती ती 40 लिटर झाली आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

गेल्या चार वर्षांपासून गाव टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाणी पुरत नाही. शेतातून फारसे काही हाती न आल्याने अनेकांच्या पोटाचा प्रश्‍न आहे. जसे प्यायला माणसी पाणी देता तसे कोणताही भेदभाव न करता रेशनचे धान्य प्रत्येकाला द्या. चाऱ्याचाही प्रश्‍न आहे. सरकारचे लोक चारा असल्याचे सांगत असले तरी वास्तव तसे नाही, अशा शब्दांत दुष्काळ पाहाणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मुरमीचे (ता. गंगापूर) सरपंच विक्रम राऊत व काही शेतकरी परिस्थितीची दाहकता आणि आपल्या मागण्या मांडत होते. 

दुष्काळाच्या पाहाणीसाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी गंगापूर तालुक्‍यातील टेंभापुरी प्रकल्प, मुरमी आणि सुलतानपुर परिसरातील दुष्काळी स्थितीची पाहाणी केली. 

गंगापुर तालुक्‍यातील काही गावांत दुष्काळाची पाहाणी केली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहोत. 
- छवी झा, केंद्रीय पथक प्रमुख. 

Web Title: Drought in marathwada

टॅग्स