मराठवाड्यातील दुष्काळाची होणार केंद्रीय पथकाकडून पाहणी

राजेभाऊ मोगल
रविवार, 2 डिसेंबर 2018

सतत कुठल्या ना कुठल्या संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळाचे संकट आले आहे. दुष्काळ निवारणासाठी केंद्राची मदत मिळावी, यासाठी बुधवारपासून (ता. 05) केंद्रीय पथक मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे. विभागातील 44 तालुके गंभीर तर तीन तालुके मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर झालेले आहेत. यापैकी निवडक ठिकाणी भेट देऊन नुकसानीचा आढावा हे पथक घेईल.

औरंगाबाद - सतत कुठल्या ना कुठल्या संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळाचे संकट आले आहे. दुष्काळ निवारणासाठी केंद्राची मदत मिळावी, यासाठी बुधवारपासून (ता. 05) केंद्रीय पथक मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे. विभागातील 44 तालुके गंभीर तर तीन तालुके मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर झालेले आहेत. यापैकी निवडक ठिकाणी भेट देऊन नुकसानीचा आढावा हे पथक घेईल.

विभागातील 76 तालुक्‍यांतील 421 पैकी 340 मंडळांत दुष्काळ घोषित झालेला आहे. मात्र, 81 मंडळांत अद्यापही दुष्काळ घोषित करण्यात आलेला नाही; तसेच दुष्काळ घोषित झालेल्या गावांमध्ये कुठल्याही उपाययोजना राबविण्यास वेग आलेला नाही. 
यंदा पाऊसच नसल्याने मराठवाडा विभागातील पिके करपून गेली. 1 जून ते 31 ऑक्‍टोबरदरम्यान वार्षिक सरासरी 779 मी. मी. असायला हवी. त्यापैकी केवळ 501 मिमी (64.41 टक्‍के) एवढा पाऊस झाला. यावरूनच येथील परिस्थितीचा अंदाज बांधता येऊ शकतो. 1 जून ते 31 ऑक्‍टोबर या एकूण 153 दिवसांच्या कालावधीत 41 दिवस कमी-अधिक पाऊस झाला असून 112 दिवस हे कोरडे गेले आहेत.

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली आहे. यामुळे केंद्रातील अधिकाऱ्यांचे पथक राज्यात येणार असून ते 5 ते 8 डिसेंबरदरम्यान हे पथक दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे. मराठवाड्यातील निवडक ठिकाणी हे पथक 5 ते 7 दिवस भेटी देणार आहे. त्यानंतर हे पथक केंद्र सरकार आपला अहवाल सोपवेल. त्यानंतर केंदाची राज्याला मदत घोषित होईल.

Web Title: drought of Marathwada will be examined by the central squad