पण मला एवढं समजतंय, दुष्काळ खूपच गंभीर आहे : आदित्य ठाकरे

विश्वनाथ गुंजोटे
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

किल्लारी : मी शहरी बाबु असल्यामुळं मला शेतीतलं, पिकांचं फार काही समजत नाही. पण मला एवढं समजतंय, महाराष्ट्रातला दुष्काळ खुप गंभीर आहे. तुम्हाला तर त्याचा जास्तच त्रास होतोय... अशा भावना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी येथे व्यक्त केल्या. आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे पक्षप्रमुखांचा वचन घेऊन मी आपल्यापर्यंत आलो आहे, असेही ते म्हणाले.

दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी ठाकरे लातूर दौऱ्यावर आले आहेत. बुधोडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ते किल्लारी या गावात जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रश्न विचारत त्यांनी आपुलकीने शेतकऱ्यांशी संवाद साधायला सुरवात केली.

ठाकरे म्हणाले, मी दोन तीन महिने दुष्काळग्रस्त भागात फिरत आहे. जालना, परभणी, नांदेड अशा वेगवेगळ्या भागात गेलो होते. कुठेही पिण्याचे पाणी, जनावरांना चारा नाही. मी शहरात राहणारा असल्यामुळे मला शेतातील जास्त काही समजत नाही. पण दुष्काळ दिसत आहे. पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे पाण्याची कमतरता आहे. यापुढे सहा महिने पाऊस पडण्याची शक्यता नाही. जगायचे कसे हा आपल्यासमोर प्रश्न आहे. म्हणुन जेथे पाणी नाही तेथे पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत. पाऊस पडेपर्यंत दररोज पाणी दिले जाईल. यासोबतच शेतकऱ्यांना पशूखाद्यही दिले जाणार आहे.’’ या उपक्रमाची सुरवातही त्यांना पाच शेतकऱ्यांना पशूखाद्य देत या वेळी केली.

या वेळी खासदार रविंद्र गायकवाड, ज्ञानराज चौगुले, माजी आमदार ओमराजे लिंबाळकर, माजी आमदार दिनकर माने, शोभा बेजरंगे, जिल्हा प्रमुख, सुतीता चाळक, जिल्हा अध्यक्ष संतोष सोमवंशी, अभय साळुंके, दत्ताजी भोसले, किशोर जाधव, किशोर भोसले, आली बागवान, तानाजी जाधव, प्रविण जाधव, कमलाकर बाबळसुरे उपस्थित होते.

निवडणुकीत राजकीय पक्षाला हार-जीत असतेच. पण निवडणुकीसाठी किंवा मते मागण्यासाठी येथे आलो नाही. संकटात आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे सांगण्यासाठी आलो आहे.
- आदित्य ठाकरे

Web Title: drought is very serious says Aditya Thackeray at Killari