वाहनाची कागदपत्रे मागितल्याने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

वाहनाची कागदपत्रे मागितल्याने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

बीड : वाहनाची कागदपत्रे मागितल्याने दोघांनी शहर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी (ता. २०) शहरात घडली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. विजय निकाळजे यांच्या फिर्यादीवरुन अंकुश विठ्ठल जाधव (वय ३०, रा. पाचेगाव, ता. गेवराई) व बळीराम राठोड (३२ रा.जायकवाडी ता.माजलगाव) या दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला. 

शहर वाहतूक शाखेचे विजय निकाळजे व शेख अन्वर हे मंगळवारी शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांनी गेवराईकडून येणारी दुचाकी अडविली. दुचाकीचालकाला नाव विचारुन त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली. अंकुश विठ्ठल जाधव (३० रा.पाचेगाव ता.गेवराई) असे नाव सांगून त्याने कागदपत्रांची मागणी केल्यावर नातेवाईक बळीराम राठोड (३२ रा.जायकवाडी ता.माजलगाव) याच्याशी संपर्क साधला. यानंतर बळीराम राठोडही तिथे आला. त्याने तुम्हाला कसले कागदपत्रे दाखवायचे, असे म्हणत अंकुश जाधव व बळीराम राठोड या दोघांनी विजय निकाळजे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. वादावादीनंतर या ठिकाणी गर्दी जमली. यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.

विजय निकाळजे यांच्या अंकुश जाधव व बळीराम राठोड या दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला. तपास फौजदार एस. बी. जाधव करत आहेत. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी भाजी मंडईत कर्तव्य बजावत असताना वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचाऱ्यासही धक्काबुक्की झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com