निवडणुकीमुळे सातशेवर आरोपी पोलिसांच्या रडारवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

बीड - पाच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत एकूण 17 गुन्हे नोंद झाले होते. या निवडणुकीतही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न हाताळण्यासाठी सातशेपेक्षा जास्त आरोपींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात निवडणुका निर्विघ्न पार पाडण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्यानुसार पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दारू-जुगार अशा अवैध धंद्यांसह चोरी-दरोडे व हाणमारीच्या गंभीर गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील आरोपींच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून 2012 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दाखल झालेल्या गुन्ह्यांतील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

2012 मध्ये निवडणूक काळात जिल्ह्यात 17 गुन्हे नोंद झाले होते. हाणामारी, बॅलेट यंत्रे व वाहनांची तोडफोड, विनापरवाना रॅली, विनापरवाना फटाके वाजविणे यांसह मतदान केंद्रांवर राडा केल्याच्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे. बीड ग्रामीण ठाणे, पिंपळनेर, आष्टी, शिरूर, युसूफवडगाव, नेकनूर, अंबाजोगाई ग्रामीण आदी ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक, तर केज, गेवराई, सिरसाळा ठाणे हद्दीत प्रत्येकी तीन गुन्हे नोंद झाले होते. वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांवरही या संदर्भात गुन्हे नोंद करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना जुन्या गुन्ह्यांतील आरोपींवर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाई झाली असून त्याचा अहवाल अधीक्षकांना सादर करण्यात आला आहे.

Web Title: Due to the elections seven hundered accused on police radar