विजेचा धक्‍का लागून युवकाचा मृत्यू

गोरख पंढरीनाथ लोखंडे
गोरख पंढरीनाथ लोखंडे

कायगाव, ता. 23 (जि.औरंगाबाद) : जुने कायगाव (ता. गंगापूर) येथे गोदावरी नदीवरील रहदारीस बंद असलेल्या जुन्या पुलाखाली नदीच्या पाण्यात कृषिपंप चालू करण्यासाठी गेलेल्या 23 वर्षीय युवकास वीजप्रवाह सुरू असलेल्या तारेचा धक्‍का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) सकाळी दहाच्या दरम्यान घडली.


पोलिसांच्या माहितीनुसार, जुने कायगाव (ता. गंगापूर) येथे शुक्रवारी (ता. 23) सकाळी थ्री फेजचा वीजपुरवठा सकाळी आठ वाजता सुरू झाला. येथील गोदावरी नदीतून पाणी उपसा करणारा कृषिपंप सुरू करण्यासाठी गोरख पंढरीनाथ लोखंडे (वय 23) हा युवक गेला असता त्यास विजेचा धक्‍का लागला.


तेथेच मोटारी बसविणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी जखमी गोरखला त्वरीत गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तेथे डॉक्‍टरांनी तपासून गोरखला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोरख अविवाहित होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com