खड्डे दुरुस्तीने वाढला आणखी त्रास

खड्डे दुरुस्तीने वाढला आणखी त्रास

गंगापूर  (जि.औरंगाबाद) : शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून, त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासी त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमलेल्या कंत्राटदारामार्फत खड्ड्यांत मलबा टाकला जात आहे. हा प्रयोग शहरवासीयांचा त्रास वाढविणारा ठरत आहे. मलब्यामुळे रस्त्यांची स्थिती अधिकच खराब झाली असून, त्यावरून वाहतूक करणे अधिक धोकादायक ठरत आहे.

भूमिगत गटार योजनेनंतर शहरातील मुख्य रस्त्याचे काम करण्यात येणार आहे, असे नगराध्यक्षा वंदना पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले होते. तोवर सध्या खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, हे काम अतिशय सुमार दर्जाचे होत आहे. यावर नगराध्यक्षा पाटील यांनी आक्षेप घेतला असून, संबंधित कंत्राटदार दर्जेदार काम करीत नसल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांना अनेक वर्षांपासून ग्रहण लागले असून, अवघ्या शहरातीलच रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. एखाद्या गावातील रस्त्यांपेक्षाही तालुका ठिकाणच्या या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अवघे रस्तेच उखडल्याचे दिसत असताना कित्येक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर शहरवासीयांना आपला जीव मुठीत घेऊनच घराबाहेर पडावे लागते.

कायगाव ते गल्लेबोरगावदरम्यान काम करणारा कंत्राटदारच हे खड्डे बुजवीत आहे. शहरातील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मुख्य काम सुरू होण्यापूर्वीच असे काम होत असल्यास काम बंद करण्यात येईल.

- वंदना पाटील (नगराध्यक्षा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com