‘सेल्फ स्टडी’मुळेच मिळाले शंभर पैकी शंभर गुण

सुशांत सांगवे
शनिवार, 8 जून 2019

लातूर : दहावी आहे म्हणून अनेकजन टेंशन घेतात; पण मी अजिबात टेंशन घेतले नाही. शाळा-क्लासमधील अभ्यासाबरोबरच ‘सेल्फ स्टडी’वर अधिक भर दिला. त्यामुळेच शंभर पैकी शंभर गुण घेता आले, अशी भावना केशवराज विद्यालयातील विवेक भरत क्षीरसागर या विद्यार्थ्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (ता. ८) जाहीर झाला. या निकालाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील २० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यात लातूर विभागातील तब्बल १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विवेक म्हणाला, ‘‘मी शाळेत नियमित गेलो. शाळेने एक्स्ट्रा क्लासही घेतले. शिवाय, मी गणित, इंग्री, विज्ञान, संस्कृत या विषयांचे क्लासही लावले होते. त्यामुळे अभ्यासाची एक दिशा मिळाली. त्या दिशेने पुढे जाण्यासाठी सेल्फ स्टडीचा मार्ग निवडला. दररोज चार तास मी अभ्यासासाठी राखून ठेवत होतो. दररोज एका विषयाचा अभ्यास करायचो. त्यात आई-वडिल दोघेही शिक्षक असल्यामुळे घरातही विषयांची तयारी करता आली. चुकीच्या ठिकाणी आई-वडिल दोघांनीही योग्य मार्ग दाखवला. कायम पाठींबा दिला. या सर्व प्रयत्नांमुळे आज हे यश मिळत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to self study vivek got 100 out of 100