मोकाट जनावरांमुळे सिल्लोडकर त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) - सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

मुख्य रस्त्यावर चौका-चौकात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहनचालकांसह पादचारी त्रस्त झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढली असून ही जनावरे अचानक आली कोठून हा प्रश्नच निर्माण झाला आहे. रस्त्यातून जनावरे हटत नसल्याने रस्त्याच्या बाजूने वाहने चालविण्याची वेळ वाहनधारकांवर येत आहे.

मुख्य रस्त्यांसह शहरातील नागरी वसाहतींमध्येही मोकाट जनावरांचा मुक्‍त संचार वाढल्याने गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांनाही याचा त्रास होऊ लागला आहे. मोकाट जनावरांचा नगर परिषदेने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to stray cattles citizens feel inconvience