औरंगाबाद - कचराकोंडीने शहराचे मानांकनही धोक्‍यात 

माधव इतबारे
गुरुवार, 7 जून 2018

औरंगाबाद : साफ सफाईसाठी देशभरातील शहरांना थ्री स्टार, फाइव्ह स्टार असे तारांकित नामांकन देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यातील इतर महापालिकांनी त्यासाठी तयारी सुरू केलेली असताना औरंगाबाद मात्र कचराकोंडीमुळे या मानांकनातून बाहेर पडण्याची शक्‍यता आहे.

सध्या रस्त्यांवर हजारो टन कचरा पडून आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी घनकचरा व्यवस्थापनासाठी निविदा काढण्याच्या तयारीत मग्न आहेत. त्यात मानांकनाच्या शासन आदेशाचा विचारही करण्यात आलेला नाही. 

केंद्र शासनातर्फे 2014 पासून स्वच्छ भारत अभियानाची अंलबजावणी करण्यात येत आहे. त्यात पुढचे पाऊल म्हणून, स्वच्छ शहरांना मानांकन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक शहराने तारांकित मानांकनासाठी स्वयंघोषणा करून तसे प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठवायचे आहेत. त्यानंतर एका वर्षासाठी थ्री स्टार, फाइव्ह स्टार असे तारांकित नामांकन जाहीर केले जाणार आहे. मात्र सध्याची कचऱ्याची स्थिती पाहता शहर या नामांकनातून बाहेर पडण्याची शक्‍यता आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने मंजूर केलेल्या 91 कोटीच्या "डीपीआर'मधून (सविस्तर प्रकल्प अहवाल) अनेक कामे करायची आहेत. सध्या निविदेतील अटी शर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. शासनाचे आदेश पाहिले, मात्र त्याचा विचार अद्याप करण्यात आलेला नाही.

Web Title: due to waste problem in aurangabad city lost their rating aurangabad