डमी परीक्षार्थी प्रकरणाची व्याप्ती वाढतीच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नांदेड - राज्यात गाजत असलेल्या डमी परीक्षार्थी प्रकरणाची व्याप्ती वाढत असून आतापर्यंत ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील काही कारागृहात असून आठ जणांना ११ मेपर्यंत पोलिस कोठडी आहे.

नांदेड - राज्यात गाजत असलेल्या डमी परीक्षार्थी प्रकरणाची व्याप्ती वाढत असून आतापर्यंत ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील काही कारागृहात असून आठ जणांना ११ मेपर्यंत पोलिस कोठडी आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या भरती प्रक्रियेतील परीक्षेच्या प्रवेशपत्रावर संगणकाच्या साहाय्याने उमेदवारांच्या फोटोमध्ये मिक्‍सिंग व मर्फिंग केले. मूळ उमेदवाराऐवजी डमी उमेदवार बसवून शासकीय सेवेत गैरमार्गाने नोकरीस लावले. या टोळीने शासनाची फसवणूक केल्याप्रकरी ‘सीआयडी’च्या विशेष पथकाद्वारे गेल्या काही दिवसांपासून धरपकड सुरू आहे. राज्याच्या विविध विभागांत शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ३६ जणांना सीआयडीचे पोलिस अधीक्षक शंकर केंगार, डीवायएसपी नानासाहेब नागदरे, श्री. स्वामी यांच्या पथकाने अटक केली. किनवट तालुक्‍यातील मांडवी ठाण्यात योगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून या संदर्भात पहिला गुन्हा दाखल झाला होता. हा प्रकार २००७ पासून सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

अटक करण्यात आलेले व नोकरीचे ठिकाण पुढीलप्रमाणे -
मुख्य सूत्रधार प्रबोध मधुकर राठोड, सचिन दत्तात्रय श्रीमनवार, पंकज संतोष बावणे, अरविंद कृष्णराव टाकळकर (परभणी कृषी विद्यापीठ), भगवान उत्तम झंपलवाड (पोलिस), योगेश मोतीराम पंचवाटकर, सोमनाथ अंभगराव पारवे पाटील (एपीआय), बळीराम ज्ञानोबा भातलोंढे, दिनेश दिगंबर सोनसकर (एपीआय), सुलतान सालेमिया बारब्बा, अक्षय संजय राठोड, अंकुश प्रल्हाद राठोड, मनोज बालचंद जाधव, अमोल माधव श्रीमनवार, रामहर्ष सुभाष निळकंठवार, सूरज मणिराम चव्हाण, अमोल गणपत दासरवार, विठ्ठल नारायण कोकुलवार, संजय देवराव कुमरे, साहेबराव भिकू चव्हाण, शिवलाल वामन जाधव, सूरज ध्रुवास जाधव, नरेश पांडुरंग पवार, श्रीकांत सुभाष चव्हाण, जगदीश रतनसिंग राठोड, मुंजा लिंबाजी गिरी, लक्ष्मण शंकर चव्हाण (सहशिक्षक, अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, अकोली, जिंतूर), धनराज नरसिंग राठोड (तलाठी, सजा मनाळी, अकोले, अहमदनगर), अनिल रावसिंग जाधव (लिपिक, आदिवासी प्रकल्प वळवण, नाशिक), स्वप्नील शिवाजी पवार (अभियंता, पंचायत समिती अर्धापूर, नांदेड), सुनील बन्शी राठोड (अभियंता, पंचायत समिती अर्धापूर), शिवप्रसाद विजय डुमणे (नेमणुकीच्या प्रतीक्षेत होता), कुणाल विनोद राठोड (लिपिक, मत्स्यव्यवसाय, मुंबई), चंदन केवलसिंग राठोड (कालवा निरीक्षक, किनवट), बाळासाहेब व्यंकट भातलवंडे आणि विशाल रंगराव पवार यांचा समावेश आहे. यापैकी फक्त चार जणांना जामीन मिळाला असून, त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी विनंती केंगार यांनी केली आहे.  

डमीचे काम करणारे संशयित बळीराम भातलोंढे, सुलतान बारब्बा, अरविंद टाकळकर आणि सोमनाथ पारवे पाटील.

Web Title: dumy student exam CID crime