बनावट आधारकार्ड मिळतेय केवळ 500 रुपयांत (वाचा कुठे घडलंय) 

सुषेन जाधव
रविवार, 15 डिसेंबर 2019

मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचे बनावट आधारकार्ड येथे एका एजंटकडून तयार करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. धनादेश अनादर प्रकरणी दाखल दाव्यात बनावट कागदपत्रांआधारे 2012 मध्ये मरणपावलेल्या व्यक्तीच्या नावावर डमी जामीनदार उभा करून जामीन मिळविल्याप्रकरणातील आरोपीने येथील एजंकडूनच हे आधारकार्ड 500 रुपयांत बनवून घेतले आहे.

औरंगाबाद : कायम वर्दळ असलेले ठिकाण म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय. विविध कागदपत्रे तयार करून घेण्यासाठी या कार्यालयासह या भागात कायम गर्दी झालेली असते; मात्र चक्क मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचे बनावट आधारकार्ड येथे एका एजंटकडून तयार करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. धनादेश अनादर प्रकरणी दाखल दाव्यात बनावट कागदपत्रांआधारे 2012 मध्ये मरणपावलेल्या व्यक्तीच्या नावावर डमी जामीनदार उभा करून जामीन मिळविल्याप्रकरणातील आरोपीने येथील एजंकडूनच हे आधारकार्ड 500 रुपयांत बनवून घेतले आहे. त्यामुळे या परिसरात बनावट आधारकार्ड काढून देणाऱ्यांची टोळीच असल्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा- एमआयएमचा आैरंगाबादेत कॅब, एनआरसी विरोधात महामोर्चा 

वरील प्रकरणात कचरू खिल्लारे (44, रा. रमानगर) याने मृत व्यक्तीच्या नावावर डमी जामीनदार उभा करून जामीन मिळवित न्यायालयाची फसवणूक केली होती. आरोपीने जयराम खिल्लारे यांच्या नावे असलेले मात्र त्यावर जयकर गडवे याचा फोटो असलेले बनावट मतदान ओळखपत्र संशयिताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एजंट अजीजभाई याच्याकडून 500 रुपयांत तयार करून घेतल्याचे कबुली दिली असून, ते ओळखपत्र कचरू खिल्लारे व साथीदारांनी पेट्रोल टाकून जाळल्याचीदेखील त्याने सांगितले. प्रकरणात तो पोलिस कोठडीत आहे. या कोठडीत सोमवारपर्यंत (ता.16) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. एम. पोतदार यांनी शनिवारी (ता.14) दिले. 

हेही वाचा- केवायसी मेसेजला रिप्लाय करताय... जरा थांबा!!! आधी हे वाचा...

हे आहे मुळ प्रकरण? 
प्रकरणात शिवकुमार हिरालाल कावळे (41, रा. गवळीपुरा, छावणी) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, प्रकरणातील राजू कांबळेला तीन लाख रुपये दिले होते. प्रकरणात परतावा करण्यासाठी त्याने दिलेला धनादेश वटला नाही. प्रकरणी न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर खिल्लारे व त्याच्या मित्राने बनावट कागदपत्रे दाखल करून जामीन मिळविला होता. 

हे वाचलंत का? - जिथून गेले पानिपतावर मराठ्यांचे सैन्य, तो किल्लाच सरकार दरबारी उपेक्षित : पहा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Duplicate Aadhar card in 500Rs. Scam in Near Aurangabad Collector Office