नकली नोटा ओळखणारी यंत्रणा अद्ययावत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

औरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा जाणवायला सुरवात झाली. त्याची झळ एक महिन्यानंतरसुद्धा कायम आहे. त्यामुळे नकली नोटा तयार करून चलनात आल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. मात्र, शहरातील सर्व बॅंकांच्या सर्व शाखांतील नकली नोटा ओळखणारी यंत्रणा अद्ययावत करण्यात आली, अशी माहिती बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

शहरामध्ये राष्ट्रीयीकृत, खासगी, को-ऑपरेटिव्ह आणि पतपेढ्या मिळून बॅंकांच्या चारशेच्या आसपास शाखा आहेत. यादरम्यान बॅंकांमध्ये जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या. त्याव्यतिरिक्‍त रिझर्व्ह बॅंकेकडून दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. त्यानंतर सर्व बॅंकांना फेक करन्सी डिटेक्‍शन अँड काऊंटिंग मशीन अद्ययावत करण्याचे आदेश मिळाले. त्यानंतर संबंधित कंपनीने शहरातील चारशेहून अधिक बॅंक शाखांच्या मशीन अद्ययावत केल्या. ज्या ठिकाणी मशीन नव्हत्या, त्या ठिकाणी नव्या मशीन बसविण्यात आल्या. दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटेवर असलेल्या "थ्रेड'च्या आधारे खरी आणि खोटी नोट ओळखली जाते. थ्रेडच्या आधारेच मशीनला नकली नोट ओळखता येते. हे मशीन अद्ययावत करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरवात झाली होती.

त्यानंतर महिनाभराच्या काळात शहरातील चारशे शाखांतील मशीन अपडेट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नकली नोटांना ताबडतोब आळा बसण्यास मदत होईल. त्याशिवाय करन्सी चेस्टमध्ये पंचवीस ते तीस लाख रुपये किंमतीची अद्ययावत मशिनरी बसविण्यात आली आहे. दोन ठिकाणी नोटांची छाननी झाल्याने नकली नोटा बाजारात येणार नाहीत.

स्टेट बॅंक ऑफ हैदराबादचे अधिकारी रवी धामणगावकर म्हणाले, की बॅंकेच्या जिल्ह्यात 48 शाखा आहेत. त्या सर्व शाखांच्या फेक नोट डिटेक्‍शन अँड काऊंटिंग मशीन अद्ययावत करण्यात आल्या आहेत. आजघडीला संपूर्ण मशीन अद्ययावत झाल्याने नकली नोटा येण्याचा धोका संभवत नाही. सर्व राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांतील मशीन अपडेट झाल्याचा अंदाज आहे.

Web Title: duplicate currency identifies system