नांदेड : सव्वादोन लाखाचा बनावट दारुसाठा जप्त 

nanded
nanded

नांदेड : गोवा निर्मित विदेशी दारू तयार करून उच्च कंपनीचे असल्याचे दाखवून बनावट दारु साठ्यावर मंगळवारी (ता. २१) हडको येथे उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यावेळी सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला. 

शहर व जिल्ह्यात अवैध्य मार्गाने विदेशी मद्याचा गोवा निर्मित मद्य येऊन त्याची उच्च प्रतीच्या मद्याच्या बाटल्यामध्ये भरणा करून विक्री करण्यात येते. त्यावर आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे आणि जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली  विशेष पथक मंगळवारी शिकारघाट व आमदूरा (ता. मुदखेड) रस्त्यावर सापळा लावून बसले होते. यावेळी इंडिका कार (एमएच२६-व्ही-१६५९) मधून गोवा निर्मित मद्याची वाहतुक होत असल्याची माहिती मिळताच त्या गाडीला थांबवून तपासणी केली. यावेळी त्यात गोवा निर्मित बॉम्बे रॉयल व्हीस्कीचे बॉक्स मिळून आले.

चालक गणेश मोतीराम बेंडे याला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने सदरचा माल हा हडको येथील सदाशिव दाजीबा राठोड याचा असल्याचे सांगितले. त्याला सोबत घेऊन पथकाने श्री. राठोड याच्या घरी छापा टाकला. घरातून बनावट इम्पेरिअल ब्ल्यु, मॅकडॉल नं.१, डिप्लोमॅट व्हीस्कीच्या बाटल्या व बुच तसेच मद्याचा साठा असा दोन लाख २३ हजार ४५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक भगवान मंडलवार यांच्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत निरीक्षक डी. एन. चिलवंतकर, एस. एस. खंडेराय, एस. एम. बोदमवाड, ए. एम. पठाण, टी. बी. शेख, के. आर. वाघमारे, मोहम्मद रफी, शिवाजी कोरनुळे, पी. पी. इंगोले, रावसाहेब बोदमवाड, दिलीप जाधव आदीनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com