जालन्यात सकाळपासून 'सोने' विक्रीला प्रारंभ, फुलांचा बाजार सजला

नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या पर्वात विजयादशमीला शुक्रवारी (ता.१५) सकाळपासून जालना शहरात ' सोने ' विक्रीला प्रारंभ झाला.
Jalna News
Jalna Newsesakal

जालना : नवरात्रोत्सवाच्या (Navratri) शेवटच्या पर्वात विजयादशमीला शुक्रवारी (ता.१५) सकाळपासून शहरात (Jalna) ' सोने ' विक्रीला प्रारंभ झाला. आपट्याची पाने, झेंडूच्या फुलांनी बाजार सजला आहे.दसरा सणानिमित्त (Dasara Festival) शहरातील विविध भागात आपट्याची पाने (सोनं) झेंडूच्या फुलांचा बाजार सजला आहे. शहरातील गांधी चमन, शनिमंदिर, उड्डाणपूल अंबड चौफुली परिसर, सतकर कॉम्प्लेक्स, शिवाजी महाराज पुतळा परिसर, मस्तगड परिसर, संभाजीनगर भोकरदन नाका यासह शहरातील अनेक चौकात झेंडूची फुले आपट्याची पाने, ऊस विक्रीला दुकाने थाटली आहेत. ग्रामीण भागात सिंधी काळेगाव, देवमूर्ती, दरेगाव, गोंदेगाव, वंजार उम्रद, रामनगर, सोमनाथ जळगाव, सारवाडी, रोहणवाडी, रेवगाव अशा गावातील शेतकरी झेंडूची फुले विक्रीस आणली आहेत.

Jalna News
अब्दुल कलामांना व्हायचे होते पायलट, मात्र बनले राॅकेट अभियंता

गांधी चमन परिसरात सकाळी सहावाजेपासून ऊस, झेंडूची फुले, आपट्याची पाने विक्रीस दुकाने आली आहेत. सध्या शेतीत पावसाने सगळच बिघडून टाकले आहे. दसरा सणासाठी लोक ऊस महत्त्वाचा मानतात म्हणून इथे ऊस घेवून आलो, असे सिंधी काळेगाव येथील युवक राम संतोष तिडके याने सांगितले. आम्ही सकाळपासून सोने विकायला आलो आहे.दहा रुपयात आपट्याची पाने देतो,असे भाग्यश्री खरात यांनी सांगितले. मागील वर्षापेक्षा यंदा कोरोना निर्बंध नसल्याने दसरा सण उत्सवात साजरा केला जाईल,सणाचा नागरिकांत मोठा उत्साह दिसून येत असून नवरात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या श्रध्देने पूजाअर्चा करीत असल्याचे पुरोहित कृष्णा महाराज जोशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com