दत्ता गाेर्डे ठरले राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार, लढवणार निवडणूक

चंद्रकांत तारु
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

पैठण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन इच्छुक उमेदवारांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार संजय वाघचौरे यांना दिलेला एबी फार्म निवडणुक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी शनिवारी (ता.पाच)  रद्द केला आहे. तर दत्ता गोर्डे यांचा निवडणुकीचा एबी फार्म मंजुर केल्यामुळे आता  राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून गोर्डे हे निवडणुक लढविणार आहे.

पैठण (जि.औरंगाबाद) ः  पैठण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन इच्छुक उमेदवारांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार संजय वाघचौरे यांना दिलेला एबी फार्म निवडणुक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी शनिवारी (ता.पाच)  रद्द केला आहे. तर दत्ता गोर्डे यांचा निवडणुकीचा एबी फार्म मंजुर केल्यामुळे आता  राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून गोर्डे हे निवडणुक लढविणार आहे.

श्री. गोर्डे यांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष पद सोडुन मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळीच गोर्डे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षक्षेष्ठींनी घेवुन पक्षाचा एबी फार्म दिला. यानंतर माजी आमदार संजय वाघचौरे यांनी समर्थकांसह मुंबई येथे तळ ठोकून उमेदवारीची मागणी केली असता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना एबी फार्म देवुन त्या सोबत वाघचौरे यांना पत्र दिले. त्या पत्रात वाघचौरे हेच पक्षाचे उमेदवार असल्याचे नमुद केले. परंतु सदरील पत्र हे निवडणुक अयोगाच्या नियमानुसार ग्राह्य  न धरता वाघचौरे यांचा एबी फार्म रद्द बातल ठरविला. दरम्यान या निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी एबी फार्म बाबत केलेल्या कार्यवाहीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून दत्ता गोर्डे यांचे नाव स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dutta Gorde Contest Election By Nationalist Congress Party