निवृत्त डीवायएसपींनी पोलिसाला कोंडून मारले

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 20 मे 2019

नांदेड : कर्तव्यावरील पोलिसास एका निवृत्त पोलिस उपाधिक्षकाने (डीवायएसपी) आपल्या घरात डांबून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर नोकरी घालवून ठार मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार देगलूर शहरात रविवारी (ता. 19) दुपारी तीनच्या सुमारास घडला. 

देगलूर शहरातील हनुमान चौक परिसरात सेवानिवृत्त पोलिस उपाधिक्षक रमेश कंतेवार यांचे घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या बांधकामासाठी जाणाऱ्या वाळूच्या ट्रकने वाहतुकीचा खोळंबा झाल्याने कर्तव्यावरील पोलिस गणपत बाबुराव शेळके (बन. 2042) हे काढत होते. यावेळी आमच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे खाता काय, असे म्हणून परिसरात दहशत पसरविली. एवढेच नाही तर पोलिसांचे कॉलर पकडून आपल्या घरात ओढून नेऊन शटरमध्ये डांबून लाथाबुक्यानी पोटात मारहाण केली. तसेच तुझ्या अंगावरील वर्दी उतरून टाकून ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर या मार्गावर चांगलीच वाहतुक खोळंबली होती.

गणपत शेळके यांनी देगलूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी निवृत्त डीवायएसपी रमेश कंतेवार, सुधाकर कंतेवार आणि रवी कंतेवार यांच्यासह अन्य दोघांवर शासकिय कामात अडथळा यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गीते हे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DYSP beaten to police at Nanded