लातुरातील पोलिस झाले हायटेक; 'इ-चलान'ला आजपासून सुरवात

E Chalan started at Latur from today
E Chalan started at Latur from today

लातूर : लातूरातील वाहतूक पोलिसही आता हायटेक झाले आहेत. त्यांच्या हातात पावती पुस्तकाऐवजी अत्याधुनिक उपकरण आले आहे. त्याचा वापर करत वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ते दंड ठोठावत आहेत. जवळ पैसे नाहीत, असे म्हणणाऱ्या वाहनचालकांना ते ‘आम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड स्वीकारतो’, असे सांगत आहेत. इतकेच नव्हे तर नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे छायाचित्रसुद्धा ते काढून घेत आहेत.

कार्यसुलभता आणि पारदर्शकता वाढावी म्हणून ‘एक देश, एक चलान’ हे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी इ-चलान पद्धत टप्याटप्याने सुरू होत आहे. लातूरात या सुविधेची सुरवात पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते मंगळवारी (ता. 14) झाली. या वेळी अप्पर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन सांगळे, पोलिस निरिक्षक नानासाहेब लाकाळ, वाहतूक शाखेच्या पोलिस उपनिरिक्षक माधुरी मुंडे उपस्थित होत्या.

स्मार्ट फोनसारखे दिसणारे 40 अत्याधुनिक उपकरणे राज्य सरकारतर्फे शहरात आली आहेत. ते शहरातील आणि तालुक्यातील पोलिस स्टेशनला प्रत्येकी एक देण्यात आले आहे. मात्र, उदगीर आणि अहदमपूर पोलिस स्टेशनला प्रत्येकी दोन देण्यात आले आहे. याशिवाय, वाहतूक शाखेच्या 15 वाहतूक पोलिसांकडेही हे उपकरण सोपविण्यात आले आहे. हे उपकरण हाताळायचे कसे, याचे प्रशिक्षण वाहतूक पोलिसांना नुकतेच देण्यात आले. आता त्याचा वापर करत वाहतूक पोलिस वाहनचालकांना दंड ठोठावत आहेत. त्यात कॅमेराचीही सुविधा आहे. त्यामुळे वाहनचालक नियम मोडतेवेळी वाहतूक पोलिस छायाचित्रसुद्धा काढून घेत आहेत. त्यानंतर ते संबंधीत वाहनचालकांना दंड आकारत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com