आरटीओचा ई-गव्हर्नन्स बरोबर करार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

औरंगाबाद - प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ई-गव्हर्नन्सबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता तब्बल सहाशे केंद्रावरून आरटीओचे ऑनलाईन कामकाज करणे शक्‍य होणार आहे. 

औरंगाबाद - प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ई-गव्हर्नन्सबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता तब्बल सहाशे केंद्रावरून आरटीओचे ऑनलाईन कामकाज करणे शक्‍य होणार आहे. 

आरटीओ कार्यालयाने अधुनिकीकरणाला अधिक महत्त्व दिले आहे. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण कामकाज संगणकीयपद्धतीने ऑनलाईन करण्यात येत आहे; मात्र हे काम करताना नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आता सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे नागरिकांना ई-गव्हर्नन्सच्या कुठल्याही केंद्रात जाऊन सेवा मिळणार आहे. तब्बल 605 केंद्रांची माहिती परिवहन कार्यालयाने सूचना फलकावर लावली आहे. या सर्व केंद्रांमध्ये नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्र अपलोड करणे, शुल्क भरणे, ऑनलाईन अपॉईंटमेंट घेणे अशी सर्व कामे करता येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कार्यालयात अर्ज जमा करून घेण्यात येणार आहेत. या शिवाय नागरिकांना इंटरनेट बॅंकिंग, डेबिट कार्ड वापरून एसबीआय, ई-पे द्वारे ऑनलाईन शुल्क भरणा करण्याची सुविधा www.parivahan.gov.in या पोर्टलद्वारे, उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरणे, शुल्क भरणा करणे, कागदपत्रे अपलोड करणे, ऑनलाईन अपॉईंटमेंट घेणे या सेवांचा लाभ घेता येणार आहे. या शिवाय परिवहन विभागाच्या प्रत्येक तालुक्‍यात होणाऱ्या शिबिर कामकाजांसाठीही याचपद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी केले आहे. 

Web Title: E-governance agreement with RTO

टॅग्स