जीएसटी अंतर्गत ई-वे-बील तपासणी महाराष्ट्र - तेलंगना सिमेवर मोहीम 

प्रल्हाद कांबळे 
गुरुवार, 14 जून 2018

नांदेड : वस्तु व सेवा कर कायदा (जीएसटी) अंतर्गत आंतरराज्य मालवाहतुकीसाठी एक एप्रील तर राज्यांतर्गत २५ मे पासून ई-वे-बील बंधनकारक करण्यात आले आहे. गुरूवारी (ता. १४) महाराष्ट्र व तेलंगना सिमेवर असलेल्या सगरोळी येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. 

या मोहीमेत व्यापाऱ्यांना व वाहतुकदारांना समज देण्यात आली असून पूढील तपासणीत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम वस्तु व सेवा कर विभागाकडून राबविण्यात आली. या मोहीमेत ई-वे-बील तपासणी करून काही त्रुटी आढळल्यास संबंधीतांना समज देऊन सोडण्यात आले. येथील राज्य वस्तु व सेवा कर विभागाचे सहआयुक्त मा.म. कोकणे यांच्या आदेशावरून आणि उपायुक्त आर. टी. धनावत यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त विकास वैद्ये यांच्या पथकांनी तपासणी केली. 
या मोहीमेत या विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी नांदेड विभागातील चारही जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत भाग घेतला होता. ही तपासणी शुक्रवारी (ता. १५) सुध्दा राबविण्यात येणार आहे. व्यापारी व मालवाहतुकदारांनी ई-वे-बील तरतुदीचे पालन करून दंडात्मक कारावाईस सामोरे जाऊ नये असे आवाहन कोकणे यांनी केले आहे. 

Web Title: E-Way-Bail inspection under GST Maharashtra- Telangana border