वापरलेल्या प्रत्येक युनिटचे वीजबिल करा वसूल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटच्या विजेचे संपूर्ण पैसे चालू बिलासह थकबाकी वसूल होणे अत्यंत आवश्‍यक आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देऊन एकजुटीने विशेष वसुली मोहीम राबवा, असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी केले.

महावितरण औरंगाबाद परिमंडल कार्यालयात विशेष आढावा बैठक घेण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे पुढे बोलताना म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळात वीज बिलिंगमध्ये सुधारणा होण्यासाठी ग्राहकांना मोबाईल ऍपद्वारे अचूक मीटर वाचन व एजन्सीकडून वेळेत बिले पोहोचणे आवश्‍यक आहे. तसेच मोबाईल क्रमांक रजिस्ट्रेशन, डिटीसी व क्रषिपंपाचे मोबाईल ऍपद्वारे मीटर रीडिंग, दीनदयाळ व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील उपकेंद्रांसाठी लागणाऱ्या जमीन हस्तांतरण प्रक्रिया, घरगुती, व्यापारी, आद्योगिक व क्रषी पंपांच्या जोडण्या प्राधान्याने देणे आदी विषयांचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीस औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, अशोक फुलकर, बाबासाहेब जाधव, सुदाम खंडारे, उपमहाव्यवस्थापक जयप्रकाश सोनी, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, रेखा भाले यांची उपस्थिती होती.

Web Title: Each unit used to recover the electricity bill