हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

हिंगोली - पांगरा शिंदे (ता. वसमत) या गावाला गुरुवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. लातूरच्या भूकंप मापक केंद्रात त्याची २.५ रिश्‍टर स्केल नोंद झाली. सुदैवाने या भूकंपात कोणतेही नुकसान झालेले नाही.

हिंगोली - पांगरा शिंदे (ता. वसमत) या गावाला गुरुवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. लातूरच्या भूकंप मापक केंद्रात त्याची २.५ रिश्‍टर स्केल नोंद झाली. सुदैवाने या भूकंपात कोणतेही नुकसान झालेले नाही.

पांगरा शिंदे येथे गेल्या पंधरवड्यात तीन ते चारवेळा भूगर्भातून गूढ आवाज आले. त्यावेळी ग्रामस्थांत भीती पसरली होती. या प्रकाराची लातूर येथील भूकंप मापक केंद्रात नोंद झाली नसल्याने या गूढ आवाजाचे गूढ कायम होते. आज सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी भूगर्भातून पुन्हा मोठा आवाज झाला. त्याची लातूरच्या केंद्रात नोंद झाली आणि २.५ रिश्‍टर स्केलचा हा भूकंप असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या भूकंपाची खोली दहा किलोमीटरपर्यंत असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले. बोल्डा, बोल्डा फाटा, वापटी, कुपटी, शिरळी या गावांतही धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

जागृतीसाठी घेणार कार्यशाळा
दरम्यान, जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, दिल्ली येथील मास्टर ट्रेनर यांच्यामार्फत पांगरा शिंदे, कुपटी, वापटी, शिरळी, राजवाडी (ता. वसमत), आमदरी, राजदरी, टेंभुरदरा, सोनवाडी, जामगव्हाण, पिंपळदरी (ता. औंढा नागनाथ), सोडेगाव, सालेगाव, असोला, बोल्डा, बोल्डावाडी, नांदापूर (ता. कळमनुरी) या गावांत कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती आल्यास ग्रामस्थांनी काय करायला हवे, कोणती काळजी घ्यावी, याबाबत कार्यशाळांत माहिती दिली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake in Hingoli District